Download App

मोठी बातमी! आमदाराच्या फोननंतर ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल; ‘हा’ आमदार कोण?

पुणे कार अपघातातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.

Image Credit: Letsupp

पुणे : पुण्यातील कार अपघातासंदर्भाने अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रोज या प्रकरणाला नवं वळन मिळत आहे. नुकतच आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल केल्याचा खुलासा समोर आला आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांना अटकही करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. यामध्ये (Blood sample) ब्लड सॅम्पलची जी अदलाबदल झाली आहे त्यासाठी एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.

पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल, आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह

या प्रकरणात आमदारानेच आरोपीचं ब्लड सॅम्पल्स बदलण्यास सांगितलं का? अशी चर्चा आता सुरु आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयात मोठ्या पदावर आहेत. ते ससूनमधील प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी एक आहेत. या सगळ्यानंतर आता डॉ. तावरेंना फोन करणारा आमदार नक्की कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचे अंश नसल्याची बाब कायदेशीर लढाईत त्याच्या पथ्यावर पडू शकते.

कचऱ्याच्या डब्ब्यात फेकलं

डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोर यांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले आणि त्याजागी एका दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने ठेवून दिले. त्यानंतर आरोपीच्या रक्ताचे सॅम्पल्स डॉ. हळनोर यानी कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिल्याचं उघड झालं होतं. विशाल अग्रवाल यानेही डॉ. अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती फोन कॉल्सच्या डिटेल्समधून समोर आली आहे. या संदर्भात आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लड सॅम्पलमध्ये कशी फेरफार झाली याबाबत माहिती दिली आहे. तसंच, या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ज्यांचा जीव गेला ते कुणाचेतरी मुलंच होते, पुणे अपघात प्रकरणात कुणाला माफी नाही -मुख्यमंत्री
आमदाराचं शिफारस पत्र

ससून रुग्णालयात डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल्स बदलण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. अजय तावरे यांचे राजकीय लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. डॉ. तावरे यांनी यापूर्वीही ब्लड सॅम्पल्स बदलण्यासारखी कामं केल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिलं होतं. तसंच, हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिलं होतं ही बाबही समोर आली आहे.

follow us

वेब स्टोरीज