Bandu Andekar House : आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचे घराचे समोर व आसपास त्याने व त्याचे कुटुंबीयांनी उभारलेल्या अनधिकृत घरे,पत्रा शेड,शौचालय हे पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी कारवाई करत जमीनदोस्त केली आहे.
आज पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात मोठी कारवाई करत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मदतीने बंडू आंदेकर याच्या अनधिकृत घरावर बुलडोजर चालवला आणि घर जमीनदोस्त केलं. नाना पेठेत बंडू आंदेकरची (Bandu Andekar) मोठ्या प्रमाणात दहशत आहे आणि हीच दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील पोलिसांना कारवाई करत बंडू आंदेकर कुटुंबाचे बॅनर, अनधिकृत स्टॉल पाडले होते तर आता मोठी कारवाई करत पोलिसांनी बंडू आंदेकराच्या घरावर बुलडोजर कारवाई केली आहे. तसेच आंदेकर टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. यामुळे बंडू आंदेकरला मोठा झटका बसला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा उभं राहू नये यासाठी सध्या पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या टोळ्यांवर कारवाई मोहीम राबवली जात आहे.
525 square feet पत्रा शेड
525 square feet पक्के बांधकाम
100 square feet पत्रा शेड
100 square feet पक्के बांधकाम
50 square feet पत्रा शेड
50 square feet पक्के बांधकाम
200 square feet चे एकूण 08 पक्के बांधकाम असलेले शौचालय
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गेल्या वर्षी कौटुंबिक वादातून गणेश कोमकरकडून हत्या करण्यात आली होती. याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने 5 सप्टेंबर रोजी गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद कोमकरची (Ayush Komkar Murder Case) गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.
लाडक्या बहिणींनो, आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक; नाहीतर मिळणार नाही 1500 रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू, अमित पाटोळे, यश पाटील यांना अटके केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.