Download App

Rain Alert : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचं संकट; हवामान विभागाने अंदाज सांगितला

Image Credit: Letsupp

Rain Alert : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच आता अवकाळी पावसाचं संकट(Maharashtra Rain) उभं राहणार असल्याचं दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पाऊस(Rain Update) बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून हवामानात बदल होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘अॅनिमल’ची टीम पोहोचली बांगला साहिब गुरुद्वारात, रणबीर कपूर-बॉबी देओलने घेतले आशीर्वाद

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार,‘ दक्षिण अंदमानच्या समुद्रात २६ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, २७ तारखेला त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे क्षेत्र वायव्येकडे सरकून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. आजपासून राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर या दिवशी मुंबई आणि रत्नागिरीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अपात्रतेच्या यादीतून नाव वगळताच कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट, पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधान

पुणे शहरात २३ रोजी सकाळपासूनच कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाली. कमाल तापमान ३१ अंशापर्यंच पोचले होते. पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातच आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. याच दिवशी मध्य महाराष्ट्रात इतरत्र आणि कोकणातही पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे.

‘लाल डायरीत’ सोनिया गांधींच्या कथित भावाचेही नाव! CM शिंदे येण्यापूर्वीच गुढांचा काँग्रेसवर बॉम्ब

मराठवाड्याला बसणार फटका
24 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तसेच 25 आणि 27 नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. शेतकऱ्यांनी फळबाग, भाजीपाला, फूल पिकांची काळजी घ्यावी. काढणीला आलेली पिके काढून घ्यावीत. तसेच आपल्याकडील पशुधनाचीही या दिवसात काळजी घ्यावी. या दिवसात पाऊस झाला तर पिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज