Download App

सोमनाथ सुर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप…

पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची (Somnath Suryavanshi) हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. राहुल गांधींनारभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना हा आरोप केला.

‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर 

सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी परभणीत दाखल झाले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडले आणि आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती राहुल गांधी यांनी घेतली. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी राहुल गांधींकडे केली. राहुल गांधींनी सुर्यवंशी कुटुंबियांसोबत अर्धा तास चर्चा केली.

थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! पहाटेपर्यंत मिळणार दारू; आदेश नेमका काय? 

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी गंभीर मोठा आरोप केला. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हे स्पष्ट झालंय की, 100 टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात राजकारण नको, तर न्याय हवा. सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा.

यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर शहर व जिल्ह्यात मोठी आंदोलने झाली. या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यात 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी हेही देखील होते. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

follow us