‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Mani Shankar Aiyar : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून विविध चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा. अय्यर यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर फक्त काँग्रेसच नाही तर विरोधी पक्षांतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं (INDIA Alliance) नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षांतील काही नेत्यांचं समर्थनही मिळालं होतं.

मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींची टीका! म्हणाले, हे देशाला घाबरवतात

अन्य एखादा पक्ष इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतो का असे विचारले असता अय्यर म्हणाले, मला वाटत नाही की हा एक योग्य प्रश्न आहे. या आघाडीचा लीडर होऊ नये अशी तयारी आता काँग्रेसनं करायला हवी. ज्याला कुणाला नेतृत्व करावसं वाटत असेल त्याला करू द्या. ममता बॅनर्जी यांच्यात तशी क्षमता आहे तसेच आघाडीतील अन्य नेत्यांमध्येही इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे अय्यर म्हणाले.

मला या गोष्टीची काळजी नाही की प्रमुख कोण असेल. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्याची स्थिती नेहमीच महत्वाची राहिल. मला खात्री आहे की आघाडीत राहुल गांधींना अध्यक्षापेक्षाही जास्त सम्मान दिला जाईल. अय्यर यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीचं नेतृत्व करू नये असे अय्यर यांना वाटते आहे का असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

मुंबईत तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून लाठीचार्ज, जाणून घ्या काय घडलं?

महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली होती. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची गरज आहे. कारण विरोधी पक्ष भाजप शासित केंद्र सरकारच्या विरुद्ध पावले उचलत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडूनही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही राहुल गांधी यांच्यावर विश्वास नाही असा अर्थ यातून प्रतित होत असल्याचे दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube