मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींची टीका! म्हणाले, ‘हे’ देशाला घाबरवतात

मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींची टीका! म्हणाले, ‘हे’ देशाला घाबरवतात

PM Narendra Modi Comment on Mani Shankar Aiyer : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे. त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरता कामा नये. कोणी वेडा आला तर तो आपल्यावर याचा वापरू करू शकतो. (Mani Shankar Aiyer ) असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी टीका केली आहे. पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. सावध राहा, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असं ते म्हणतात. आज पाकिस्तानची अवस्था अशी आहे की, आता त्यांच्यावर अणुबॉम्ब विकण्याची वेळ आली आहे, पण त्यालाही खरेदीदार सापडत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्ब पडला; अब्रूनुकसानीच्या दाव्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला

बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेऊ शकतो

मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचं म्हटलं होतं. आपल्याकडेही बॉम्ब आहेत, पण जर कोणी लाहोरवर बॉम्ब टाकला तर रेडिएशन अमृतसरलाही 8 सेकंदात पोहोचू शकते असंही अय्यर म्हणाले होते. तसंच, पाकिस्तानला आदराने वागवण्याबाबतही ते बोलले. पाकिस्तानचा आदर केला तर ते शांततेने राहतील. नाहीतर त्यांच्यातील कुणी भारतावर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेऊ शकतो असंही ते म्हणाले होते. त्यावरून मोदींनी जोरदार टीका केली.

 

भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

सावध राहा

ओडिशातील कंधमाल येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “एक तो दिवस होता जेव्हा भारताने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. दुसरीकडे, काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘सावध राहा, पाकिस्तानडे अणुबॉम्ब आहे, हे मरतुकडे लोक देशालाही मारत आहेत. काँग्रेसची नेहमीच असं धोरणं राहीलं आहे असही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube