मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्ब पडला; अब्रूनुकसानीच्या दाव्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला

  • Written By: Published:
Sanjay Raut 2

मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मला वाटलं अब्रूनुकसानीचा दावा केला म्हणजे मोठा अनुबॉम्बच पडला. अशा नोटिसा रोज येतात. सोडून द्या तो विषय असा खोचक टोला संजय राऊत यांनी राहुल शेवाळे यांना लगावला आहे.

खासदार राहुल शेवाळेंवर काही दिवसापूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. राहुल शेवाळेंनी हे आरोप फेटाळून लावत संबंधित तरुणीचे दाऊद आणि अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचा दावा केला होता. त्यावरही या तरुणीने आपला पासपोर्ट चौकशीसाठी जमा करण्याची तयारी दाखवल्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात ‘दोपहर का सामना’ वृत्तपत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने वृत्त छापून आल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला. यावर राहुल शेवाळे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

मुंबई महापालिकेसाठी शिंदे गट आणि भाजपने रणनीती आखली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की त्यांची कसली रणणीती ? खोके,पेट्यावाली. त्यांना रणणीती काय माहित आहे. आणि खरी रणणीती लोक ठरवतील. अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांचा मुंबई रोड-शो झाला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Tags

follow us