सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखेला न्यायालयीन कोठडी; आर्थिक गुन्हे शाखेकडून चार गु्न्ह्यांचा तपास सुरू

Rahul Kalokhe Sispe scam judicial custody सिस्पे घोटाळ्यातील आरोपी राहुल शामराव काळोखे याला न्यायलयीन कोठडीत आहे.

Sispe

Sispe

Rahul Kalokhe, prime accused in Sispe scam, remanded to judicial custody Economic Offences Wing investigating four cases : अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या सिस्पे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व आरोपी राहुल शामराव काळोखे याला फिजी देशातून इंटरपोलच्या मदतीने अटक करून भारतात आणण्यात आले. भारतात आणल्यानंतर त्याला अहिल्यानगर पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला श्रीगोंदा येथील गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळविली होती. त्याचा तपास संपल्यानंतर आता तो न्यायलयीन कोठडीत आहे.

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना जाणार?, 39 प्रतिज्ञापत्रांमध्ये 2018 ची पक्षघटना कशी आली? सिब्बलांचा मुळावर घाव

आरोपी काळोखे याला सध्या अहिल्यानगरच्या उपकारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरूद्ध जिल्ह्यात इतरही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला सुपा, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत वर्ग करण्यात येऊन तपास केला जाण्याची शक्यता आहे. सध्या मात्र, या गुन्ह्याचा तपास मंदावल्याचे दिसून येते.

अभिनेता गोविंदासोबत वाद कसा मिटला?, घटस्फोटाचा अर्ज मागं का घेतला?, पत्नी सुनीता अहुजा यांची भूमिका काय?

बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन व तत्सम कंपन्यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात फिजी येथून भारतात यशस्वीरीत्या प्रत्यर्पण करण्यात आलेल्या राहुल शामराव काळोखे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून शुक्रवारी जुलै (ता.३१) श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एकुण चार गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत १३ संशयित आरोपींना अटक केली आहे.

‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; शंभर कोटींचा टप्पा पार

पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करीत आहेत. तपासादरम्यान संशयित आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी करण्यात आली असून, विविध मालमत्तांचा तपशील संकलित करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ११४ कोटी ९३ लाख रूपयांच्या मालमत्तेच्या जप्तीच्या एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम) प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि सोनी मराठी वाहिनीचा आठ वर्षांच्या हास्यप्रवासाचा सेटवर जल्लोष; टीमकडून वर्धापनदिन साजरा

काही प्रमुख संशयित आरोपी देशाबाहेर पसार झाले होते. त्यांच्या विरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असून, त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांतून राहुल काळोखे याला फिजीमध्ये शोधून तेथील स्थानिक अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्यात आले. भारतात आणण्यात आले व आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर त्याचा ताबा घेतला. त्याला शुक्रवारी (ता.३१) श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सखोल तपासकामी पोलीस कोठडी दिली. आता संबंधित आरोपी हा न्यायालयीन कोठडी रवानगी केली असून सुपा तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

MNVचे नवे गाणे ‘Gadbadi’ प्रदर्शित; मानव बजाज यांचा नवा म्युझिकल अंदाज

दरम्यान, राहुल काळोखे हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अगस्ती मिश्रा याचा निकटवर्तीय व हस्तक असल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या सहकार्सह संगनमत करून गुंतवणूकदारांना अत्यंत जास्त आणि हमखास परताव्याचे खोटे आश्‍वासन देत विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीच्या अटकेवरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

Exit mobile version