Download App

Pune Rain Alert : पावसाचा पुणे – मुंबईला फटका, रेल्वे वाहतूक बंद; ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द

Pune Rain Alert : आज सकाळपासून पुण्यात (Pune Rain) होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Rain Alert : आज सकाळपासून पुण्यात (Pune Rain) होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आतापर्यंत पुण्यात मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai Rain) देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. माहितीनुसार,ठाणे, कल्याणमधील नद्यांना मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहुन-पुण्याकडे आणि पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आले आहे. यामध्ये डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express) , प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) , इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express) यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे उद्या (26 जुलै) देखील मध्य रेल्वेने काही एक्सप्रेस गाड्या रद्द केले आहे. त्यामध्ये पुण्याहून-मुंबईकडे जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्सप्रेसचा समावेश आहे तर उद्या मुंबईहुन-पुण्याकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि खडकवासला भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच आज या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

पाण्याचा विसर्ग वाढणार

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत.

Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा

जेणेकरून रात्रीतून जास्त पाऊस झाला तरी ते पाणी धरणामध्ये साठवता येईल. पाणी सोडायचे असेल तर आताच काही प्रमाणात सोडा. रात्री उशिरा पाणी सोडल्यास नागरिकांना त्रास होईल, रात्री 7 नंतर विसर्ग वाढवण्यात येऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

follow us