पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस धो धो पाऊस, अलर्ट जारी

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस धो धो पाऊस, अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात जोर धरला असून राज्यातील अनेक भागात 29 जूनपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाकडून (IMD Rain Alert) पुढील चार ते पाच दिवसांसाठी पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यांना अर्लट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आले आहे.

पुढील 3 दिवस कुठे काय अलर्ट ?

हवामान विभागाकडून 3 जुलै रोजी पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक घाटसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर 4 जुलैसाठी, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदेंचा, दोन वर्षानंतर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

तर 5 जुलैसाठी हवामान विभागाकडून रत्नागिरी, रायगड, पुणेसह सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदियाला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube