धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदेंचा, दोन वर्षानंतर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदेंचा, दोन वर्षानंतर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Shiv Sena Symbol Case : येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा (Shiv Sena Symbol Case) करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून हे प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मेन्शन करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलिबिंत असल्याने हे प्रकरण बोर्डावर लवकरात लवकर घ्या अशी मागणी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीनंतर 16 जुलै रोजी न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हवाला देत लवकरात लवकर चिन्हावर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणात लवकर सुनावणी करण्यात यावी असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वकिलांनी न्यायालयात केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून तातडीच्या सुनावणीला शिंदे गटाकडून (Eknath Shinde) विरोध करण्यात आला आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याने तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने फ्रेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना चिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला होता. त्यानंतर या प्रकरणात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित असून आता या प्रकरणात 16 जुलैला सुनावणी होणार आहे.

प्रकरण काय?

2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने शिवसेनेत उभी फूट पडली होती. पक्षात उद्धव आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले होते.

बर्मिंगहॅम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह का नाही? कर्णधार शुभमन गिलने केला मोठा खुलासा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला लागला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंबाने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube