हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचं आंदोलन; उद्धव ठाकरेंकडून शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी

Shiv Sena Protest Against Hindi Compulsion : महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानात आज (29 जून) ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Hindi Compulsion) आयोजित आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक ( Shiv Sena Protest) होळी केली.
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी
या आंदोलनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत सांगितलं, ‘आम्हाला हिंदी भाषेला विरोध नाही, मात्र जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या हिंदीसक्तीला आमचा ठाम विरोध आहे. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी शिवसेना सदैव सज्ज आहे.’
महायुती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर ‘मविआ’चा बहिष्कार ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती
सरकारच्या जीआरची प्रतीकात्मक होळी
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारच्या जीआरची प्रतीकात्मक होळी करत संताप व्यक्त केला. ‘अभ्यास न करता हा निर्णय लादण्यात आला आहे. हा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर आम्ही संपूर्ण राज्यभर जनआंदोलन उभारू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
अंमलबजावणीशिवाय मुंबई सोडणार नाही; मनोज जरांगेंनी उद्याचं आजच सांगितलं…
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 5 जुलैला गोरेगाव चौपाटी येथून निघणाऱ्या मराठी अभिमान मोर्चातही उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. या मोर्च्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शविला असून मोठ्या संख्येने मराठी जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. महायुती सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध करत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पुन्हा एकदा शिवसेना रस्त्यावर उतरली असून, हा विषय आगामी राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.