उद्धव ठाकरे दुतोंडी साप की गांडूळ? रामदास कदमांचा सवाल

शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या सभेत खोचक टीका केली होती. त्यावर रामदास कदमांनी चोख प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही; शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेचा निर्णय […]

Ramdas Kadam

Ramdas Kadam

शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या सभेत खोचक टीका केली होती. त्यावर रामदास कदमांनी चोख प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही; शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेचा निर्णय ठेवला राखून

रामदास कदम म्हणाले, बारसू काय चौपाटी आहे का? पिकनिकला जाताय. बारसुचा प्रस्ताव तुम्हीच पाठवला आणि आता लोकांना भडकवायला पण तुम्हीच जाताय का? उद्धव ठाकरे दुतोंडी साप की गांडूळ हेच कळत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच बारसुला रिफायनरी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचे काम ते करणार आहेत. बारसुला रिफायनरी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Sharad Pawar Retirement : अजितदादांचा वेगळा सूर; अनिल देशमुखांनी बोलणंच टाळलं

बारसुला गेलात तर लोक तोंडावर थुंकतील. शरद पवारांना बाप म्हणताय, तर त्यांच्याकडून काहीतरी शिका. उद्धव ठाकरे हे दुतोंडी गांडूळ किंवा दुतोंडी साप आहेत. हेच कळत नाही. ठाकरे यांचा हा दुतोंडीपणा सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले. ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या कोकणातील खेडच्या सभेपूर्वीच रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख दुतोंडी साप की गांडूळ असा केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version