Release of Lean Spark in Fuel : भारतीय संशोधनाची विशेषता मर्यादित संसाधने वापरून गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण करणे. काटकसरीचे नवोन्मेष, तात्पुरते उपाय आणि लवचिकता व वेग यातून अपारंपरिक शोध असतो त्यालाच जुगाड असे संबोधू शकतो. असे मत केम्ब्रीज विद्यापीठातील नेहरू प्रोफेसर ऑफ इंडियन बिझनेस अॅट जज बिजनेस स्कूलचे प्राध्यापक व लेखक जयदीप प्रभू यांनी व्यक्त केले. फ्यूल बिजनेस स्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रा. लेखक जयदीप प्रभू लिखित लीन स्पार्क या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते.
यावेळी फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे व प्रा.मयूरी देशपांडे ह्या उपस्थित होत्या. प्रा.जयदीप प्रभू म्हणाले, लीन स्पार्कची चार वैशिष्ट्ये आहते. लीन अमंलबजावणी महत्वाची असून संरचित प्रयोग आणि निरंतर शिक्षण गरजेचे. उद्देशपूर्ण साधेपण असावे ज्यात आवश्यक वैशिष्ट्ये व अनावश्यक गुंतागुंत दूर करणे आणि अनुकूलनक्षम विस्तारक्षमतेत विविध वातारवणांमध्ये विकसित होण्यासाठी डिझाइन करणे गरजेचे आहे.
साठीनंतर असे कृत्य अयोग्य, भगवानबाबांची परिस्थिती वेगळी होती, आदिनाथ महाराजांना नामदेव शास्त्रींचा सल्ला
तसेच मोठ्या संस्थांसाठी कार्य करतांना भरपूर शिकणे, चपळ व्हायला शिकणे, वगळलेले गट समाविष्ट करणे, कर्मचार्यांना प्रयोग करण्यासाठी वेळ आणि संधी देणे. चपळ उद्योजकांसह व्यस्त रहाणे आणि उद्योन्मुख बाजारपेठांशी संलग्नीत होऊन जुगाड करायला शिकण्याची मानसिकता ठेवावी. त्याच प्रमाणे लहान संस्थांनी मोठ्या संस्थांसोबत भागीदारी करायला शिकावे.
डॉ. केतन देशपांडे म्हणाले, फ्यूल संस्था राष्ट्र निर्मिती साठी कार्य करीत आहे. युवकांच्या या देशात कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारत बनावयास वेळ लागणार नाही. आर्थिक महासत्ता म्हणून उद्यास येणार्या भारतात आता संशोधनला अधिक प्राधान्य द्यावे. सध्या देशाला स्कील बेस्ड युवकांची गरज आहे. या प्रसंगी लेखक जयदीप प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सल्ला दिला की नेतृत्व गुण,कष्ट, संशोधन आणि कमी खर्चात सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे. यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केल. सूत्रसंचालन सान्वी महेश जोगदंड या विद्यार्थीनीने केले.
