Download App

‘मला पक्षातून काढून टाका नाहीतर..,’; नाराज बबनराव घोलपांचा खुलासा

मला पक्षातून काढून टाकावं किंवा स्वीकारायचं असेल तर माझा दोष, सांगा या शब्दांत माजी मंत्री बबनराव घोलप(Babanrao Gholap) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन ठाकरे गटात(Thackeray Group) धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Waghchoure) यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याचं दिसून आलं.

नेहरू, कॅश फॉर व्होट अन्… PM मोदींनी सांगितल्या संसदेच्या इतिहासातील कडू-गोड आठवणी

पुढे बोलताना घोलप म्हणाले, मी शिवसेना सोडलेली नाही. मी आजही कार्यक्रमाला, मीटिंगला बोलवलं तर जातो. माझं म्हणणं एवढं आहे की, जे घडलं त्यावर मातोश्रीनं मला उत्तर द्यायचं आहे. मला एकतर पक्षातून काढून टाकावं किंवा स्वीकारायचं असेल, तर माझे दोष काय होता ते मला कळलं पाहिजे? असा खडा सवालही घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे; दोन ‘सर्वोच्च’ सुनावण्या एकाच दिवशी

बबनराव घोलप हे गेल्या दहा वर्षांपासून शिर्डीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे एेनवेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी घोलपांचा मुलगा योगेश घोलपही इच्छुक होते. आता पुन्हा 2024 साठी घोलप हे शिर्डीतून इच्छुक होते. त्यांनी तयारी सुरू केली होती. परंतु एेनवेळी उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. तसेच त्यांनी उमेदवारीचा शब्दही देण्यात आला आहे. त्यामुळे घोलप ही नाराज झाले.

Asia Cup 2023 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारतीय संघात कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री

त्यानंतर बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ते इच्छूक होते. परंतु ऐनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदावर हटविण्यात आले. या दोन्ही कारणांमुळे घोलपांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, मला ठाकरे गटाकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. मला दुसऱ्या पक्षात जायचं असतं, तर केव्हाच गेलो असतो, आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सेनेमध्ये ज्या फुटी-टूटी होतात हे कशामुळे होतं? यामध्ये पक्षप्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये चांगले वातावरण आहे. लोकांची अपेक्षा आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यामुळे पक्षामध्ये घडणाऱ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी थांबवल्या पाहिजेत, असंही घोलप म्हणाले.

Tags

follow us