Asia Cup 2023 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारतीय संघात कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री

Asia Cup 2023 :  श्रीलंकेने टॉस जिंकला! भारतीय संघात कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री

आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंकेची चुरशीची लढत होणार आहे. अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार असून श्रीलंकेने टॉस जिंकला आहे. श्रीलंका संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाधवांना हवाय पवारांचा आशीर्वाद; ठाकरेंच्या विजयाचं गणितही सांंगितलं

आशियाई चषक सामन्यात भारताने विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारून ‘आशियाई किंग्ज’ श्रीलंकेने फायनलचे तिकिट मिळवले आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

आत्तापर्यंत भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा आशिया चषकाचा किताब उंचावला आहे. तर श्रीलंकेने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. गतवर्षी पाकिस्तानला पराभूत करून यजमान श्रीलंकेने दासुन शनाकाच्या नेतृत्वात ही किमया साधली होती. त्यामुळे आज आशियातील दोन यशस्वी संघ पुन्हा एकदा ‘आशियाई किंग्ज’ कोण हे सिद्ध करण्यासाठी सामना होणार आहे.

श्रीलंकेच्या खेळपट्टीवर आव्हानाचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले जाते. याचा प्रत्यय देखील आशिया चषकात पाहायला मिळाला. खरं तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube