Download App

मुख्यमंत्री फडणवीस सध्या सहाव्या गिअरवर; बाकी मंत्री मात्र फक्त…काय म्हणाले आमदार रोहित पवार?

यावेळी रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्यावरही जोरदार प्रहार केला. अजित पवार यांच्या पक्षातील सर्वच लोक शरद पवार यांना

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : आमच्या खासदारांशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे यांनी संपर्क केल्याची चर्चा आहे. परंतु, आम्ही सर्वजण सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत. त्यामुळे असं काही घडणार नाही असं मत आमदार (Rohit Pawar ) रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोठी बातमी! शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

यावेळी रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्यावरही जोरदार प्रहार केला. अजित पवार यांच्या पक्षातील सर्वच लोक शरद पवार यांना आदरणीय मानत असतील. त्यामध्ये सुनिल तटकरेंबद्दल मला काही सांगता येत नाही. कारण ते फार प्रॅक्टीकल नेते आहेत. जस वार वाहतय तस फिरणारे आहेत. सध्या ते सत्तेत आहेत. त्यांच्या बरेच अडचणी दूर झालेल्या आहेत असा टोलाही रोहित पवार यांनी लागवाला आहे. त्यामुळे तटकरे सोडले तर बाकी सगळे शरद पवारांचा आदर करत असतील असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक

अजित पवार काही दिवस सुट्टीवर होते हे खर आहे. परंतु, त्यांनी काही काळ बाहेर जाण यामध्ये काही वावगं नाही. ते फोनवरही काम करत असतील. मात्र, मंत्रिमंडळाचा विचार करता यामध्ये जे प्रमुख आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सहाव्या घेरवर चालत आहेत. त्यांनी अनेक विभागांच्या बैठका घेऊन काम मार्गी लावले आहेत अशा शब्दांत रोहित पवार यांनी फडणवीसांची टीका केली आहे. त्याचबरोबर इत मंत्री मात्र, हार-तुरे सत्कार यामध्ये गुंतलेले आहेत असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

देशमुख कुटुंबात राजकारण करणं योग्य नाही. त्याचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. बाकी, मी तु्म्हाला सांगतो बीड जिल्ह्यात कोणत्याही निर्णयात वाल्मिक कराडशिवाय होत नाही असा थेट घणाघात केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे यामध्ये या खून प्रकरणात आहेत असं आम्ही म्हणत नाहीत. परंतु, तुमचा जवळचा माणूक खून करतो आणि तुम्ही मंत्री पदावर हे योग्य नाही. त्यामुळे नैतिकता पाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

 

Tags

follow us