Download App

Rohit Pawar : …तर राज्य सरकारच कंत्राटी पद्धतीने कंपनीला चालवायला द्या; रोहित पवारांची टीका

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : सरकारने कंत्राटी भरतीसाठी जीआर (शासन निर्णय) काढला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यात 75 हजार जागांची भरती होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यातील तलाठी, आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे कंत्राटी भरतीची (Contract job) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला आहे. या कंपन्या जवळपास 85 संवर्गातील पदांची भरती करणार आहेत. त्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

टीम इंडियाला आजच मिळणार फायनलचं तिकीट!; जाणून घ्या, श्रीलंकेतील हवामान

राज्य सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या…

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या. असं म्हणत कंत्राटी भरतीवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.

Maratha Reservation चा हिरो झळकणार पडद्यावर; जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लाँच…

पुढे पवार म्हणाल की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी,शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी 8-10 कोटी व त्याच्या जाहिरातीवर 52 कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकरभरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते? अशी टीका रोहित पवारांनी केली.

भरतीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपन्या अशा…

– ‘एक्सेट टॅक्स सर्व्हिस लिमिटेडमध्ये सौरव विजय मुहुरकर, इंद्रजित सूर्यकांत शिंदे, अभय अनंत गजभिये हे संचालक आहेत.

– CMS IT serv- संचालक अनुराग मेहरोत्रा हे आहेत. इनोवेव्ह आयटी इंफ्रा कंपनीचे संचालक मंडळात अनंत नारायण रघुते , राहुल अण्णासाहेब डोकचौले हे आहेत.

– क्रिस्टलचे संचालक आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय आहेत. यात नीता प्रसाद लाड , सायली प्रसाद लाड हे संचालक आहेत. S २ इंफ्राचे संचालक अनुराग प्रदीप भुसारी, राजीव वाघ हे आहेत.

– नऊ कंपन्यांमधील क्रिस्टलचे संचालक नीता यांचे पती प्रसाद लाड हे विद्यमान आमदार आहेत. शासकीय संस्थांचे अनेक मनुष्यबळ पुरवठाचे कंत्राट या कंपनीकडे आहेत. संविधानिक पदावर असताना शासनाचे कंत्राट घेता येतात का ? याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us