धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नको, या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारने उत्तर द्या; सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

Sadabhau Khot On CJP Protest : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हजारो

Sadabhau Khot On CJP Protest

Sadabhau Khot On CJP Protest

Sadabhau Khot On CJP Protest : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हजारो विद्यार्थी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर जमले आहे. 20 जुलै रोजी या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. तसेच या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले की, पेपरफुटीविरोधात दिल्लीत गोंधळ सुरु आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे. दोषींना पकडले गेले आहे,वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरु आहे. दोषींना सोडणार नसल्याची भूमिक सरकारने घेतली आहे. नीट उत्तीर्ण झाले ते ॲडमिशनसाठी धावपळ कत आहे मात्र ज्यांचा संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही त्यांचा राजीनामा सरकारने घेऊ नये असं सदाभाऊ खोत म्हणाले.

तर पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचे आदेश दिले आहेत मात्र इंडिया आघाडी आणि मविआ केंद्र आणि राज्यातील सरकारांच्या विरोधात वातावरण तयार करत आहे. सातत्याने खोटे बोलत आहे. इंडिया आघाडी, मविआ (MVA) म्हणते आमचा संबंध नाही मात्र एक ट्रोल आहे, जयंत पाटील यांचा ग्रुप चालवतो. राष्ट्रवादी संपूर्ण प्रकरण अशांतता माजवण्याचे प्रकरण करत आहे. आय लव्ह जयंत पाटील (Jayant Patil) पेजवर देखील आंदोलनात तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले.

आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या

तर इंडिया आघाडी, मविआ आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करु पाहात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने मुळीच घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत. या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारने उत्तर द्यावे असेही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.

प्रशिक्षणार्थी IPS अधिकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; महिला IPS चे खासगी व्हिडिओ पतीला पाठवून ब्लॅकमेलचा आरोप-

सदाभाऊ खोत यांचं विधान अत्यंत चुकीचं – बच्चू कडू

तर दुसरीकडे सदाभााऊ खोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आमदार बच्चू कडू यांनी सदाभाऊ खोत यांचं विधान अत्यंत चुकीचं आहे, त्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यांनी आपल विधान मागे घेतल पाहिजे. आंदोलन ही या देशाचा आत्मा राहिली आहेत, आंदोलनातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना राजीनामा मागण्यासोबत व्यवस्था कशी सुधारता येईल यावर देखील विचार करावा असं म्हटले आहे.

Exit mobile version