धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला; “यंदा गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार,”

सतेज पाटील हे सध्या ‘समविचारी पक्षांना’ सोबत घेण्याच्या भूमिकेतून गोकुळच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. यावरून महाडिक यांनी त्यांच्यावर टीका केली.

Dhananjay Mahadik Targets Satej Patil

Dhananjay Mahadik Targets Satej Patil Ahead of Gokul Polls : गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk Union) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महायुती गोकुळमध्ये पुन्हा सत्ता कायम ठेवेल, असा दावा करत काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. “यंदा गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार,” असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.

नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाडिक यांनी यावेळी महायुतीच्या विजयाचा दावा करत 25 विरुद्ध शून्य अशा फरकाने सत्ता मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी अशी लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘उमेदवार नसल्याने सतेज पाटील भेटीगाठी घेत आहेत’

सतेज पाटील हे सध्या ‘समविचारी पक्षांना’ सोबत घेण्याच्या भूमिकेतून गोकुळच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. यावरून महाडिक यांनी त्यांच्यावर टीका केली. समविचारी आघाडीचा मुद्दा आता पुढे केला जात आहे, मग यापूर्वी ही आघाडी कुठे होती?, असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, सतेज पाटील यांच्या गटाकडे सध्या पुरेसे उमेदवार नसल्यामुळे विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.

शरद पवारांनी भाकरी फिरवली! पक्षात केला मोठा फेरबदल; 10 नव्या प्रवक्त्यांची घोषणा

‘विधानसभेप्रमाणे गोकुळवरही महायुतीची सत्ता’

गेल्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांचा संदर्भ देत महाडिक यांनी यंदाच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही महायुतीचेच पारडे जड राहील, असा दावा केला. महायुतीच्या घटक पक्षांचे नेते, आमदार आणि संचालक यांच्या पातळीवरही निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सतेज पाटील आणि महाडिक गट एकत्र येणार?

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील आणि महाडिक गट एकत्र येण्याची शक्यता आहे का, या चर्चेलाही महाडिक यांनी पूर्णविराम दिला. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही गट एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

FDAला मुंबई हायकोर्टाचा दणका; सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे

त्याचवेळी, राजकारणात कोणताही व्यक्ती कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, अशी सावध भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतचे दरवाजे पूर्णपणे बंद नसल्याचे संकेतही त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

सतेज पाटलांकडूनही गोकुळसाठी जोरदार तयारी

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. समविचारी पक्ष आणि नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची त्यांची भूमिका आहे.

याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी महायुतीतील काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या हालचालींमुळे महायुतीच्या गोटातही समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे.

मुश्रीफ, शिवसेना, जनसुराज्य आणि महाडिक गटाची समीकरणे

गोकुळच्या निवडणुकीमुळे कोल्हापुरातील विविध राजकीय गट सक्रिय झाले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट, शिवसेना, जनसुराज्य आणि महाडिक गट यांच्यातील अंतर्गत समीकरणांकडेही लक्ष लागले आहे.

तुम्ही देव आहात आणि काहीही करू शकता असं वाटते का? कोर्टाने FDA ला फटकारले

दुसरीकडे सतेज पाटील हे महाविकास आघाडीतील घटकांना आणि इतर समविचारी नेत्यांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत कोणता गट कोणासोबत जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील ही निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता आहे. आगामी काळात उमेदवारांची निवड, आघाड्यांची बांधणी आणि नेत्यांच्या भेटीगाठी यावरून गोकुळच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

follow us