Download App

महात्मा गांधीबद्दलचं वक्तव्य महागात! संभाजी भिडेविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यभरा उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावती येथील राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास केला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांनी दिली.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आज भिडे यांचा यवतमाळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, काँग्रेसने या नियोजित कार्यक्रमाला तीव्र विरोध केला. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने होत असल्याने आज या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेस नेत्यांचा तीव्र संताप

याआधी काल विधीमंडळात काँग्रेस नेते भिडे यांच्यावर तुटून पडले होते. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत सरकारने त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका करत संभाजी भिडे हे भाजपाचेच पिल्लू असल्याचं म्हटलं  होतं.

Tags

follow us