Sambhajinagar Violence : राज्यपालांनी दिले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आदेश!

Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर येथील घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच या दंगलीत दोषी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात राडा झाला. जमावाने गाड्यांची नासधूस करत पोलिसांच्या गाड्या देखील जाळल्या. Chandrkant Patil यांनी […]

Ramesh Bais Eknath Shinde

Ramesh Bais Eknath Shinde

Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर येथील घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच या दंगलीत दोषी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात राडा झाला. जमावाने गाड्यांची नासधूस करत पोलिसांच्या गाड्या देखील जाळल्या.

Chandrkant Patil यांनी पवारांना पुन्हा डिवचलं : कुणी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्री होतो… – Letsupp

राज्यपाल रमेश बैस यांनी संभाजीनगरच्या दंगलीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत सविस्तर माहिती घेतली. तसेच या दंगल, जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी (३० मार्च) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आढावा घेतला. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणाऱ्या सर्व हल्लेखोरांना शोधून काढा आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version