Chandrkant Patil यांनी पवारांना पुन्हा डिवचलं : कुणी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्री होतो…

Chandrkant Patil यांनी पवारांना पुन्हा डिवचलं : कुणी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्री होतो…

Chandrakant Patil : कुणी पहाटेच्या अंधारात अचानक मुख्यमंत्री होतो. तर कुणी रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री होतो असे वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत यांनी केले आहे. पण ही क्षणभंगुरता आहे, पराधीन आहे, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्री म्हणायचे होते की उपमुख्यमंत्री असा असे म्हणायचे होते, असा प्रश्न पडला आहे.

चंद्रकांत पाटील हे आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री म्हणायचे ऐवजी मुख्यमंत्री म्हटले का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. २०१९ ला एकीकडे महाविकास आघाडी सरकार स्थापण्याच्या हालचाली करत होते. नेमके त्याचवेळी अचानकपणे संपूर्ण राज्याला धक्का देत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पहाटे पहाटे शपथ घेतली. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यासह देशभर खळबळ माजली. त्यावरून अजित पवार यांना आत्तापर्यंत बऱ्याच वेळा टीका टिप्पणी करण्यात आली. पण अजित पवार त्यावर काही बोलायला तयार नाहीत. योग्य वेळ आल्यावर बोलेन एवढंच ते बोलत आहेत.

Balasaheb Thorat : २० हजार कोटींचा ‘तो’ प्रश्न विचारला… अन् गांधीची खासदारकी गेली! – Letsupp

मात्र, असे असले तरी या प्रसंगावरून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात याच मुद्धावरून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु, पाटील यांच्याकडून बोलण्याच्या ओघात चुकून उपमुख्यमंत्री ऐवजी मुख्यमंत्री असा शब्द आला की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावला आहे, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे.

याच भाषणात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. चंद्रकांत म्हणाले की, जे एका क्षणात खुर्चीवरून उतरले. ते २५ वर्षे आम्हीच राज्य करणार असे म्हणत होते. त्यांना हे माहित नव्हतं. हे क्षणभंगुर आहे, पराधीन आहे. त्यामुळे उगाच कशाला बडाया मारायच्या असे ठाकरे आणि राऊत यांना टोला लगावला.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube