Download App

राजकीय वातावरण तापल! संदीप कोतकरांच्या जिल्हा प्रवेशाला विरोध

Sandeep Kotkar : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी राजकीय डावपेच सुरु झाले आहे.

  • Written By: Last Updated:

Sandeep Kotkar : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी राजकीय डावपेच सुरु झाले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, जिल्ह्यात गाजलेल्या लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांच्या जिल्हा प्रवेशाला या प्रकरणातील गुन्ह्याचे फिर्यादी शंकर राऊत (Shankar Raut) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिले आहे मात्र सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आतपर्यंत सुनावणी झाली नसल्याने मेडीकल पॅरीटीवर दिलेल्या जामीन बाबत उच्च न्यायालयात (High Court) रिव्ह्यू पीटिशन करून आव्हान देण्यात आले असून मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात संदीप कोतकर हे विधानसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगत आहे मात्र आता पुन्हा लांडे खून प्रकरण नव्याने उघडण्यात आल्याने याला काही राजकीय वास आहे का? अशा चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.

अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर आणि त्यांची तीन मुले माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह सचिन व अमोल कोतकर यांना दोषी ठरवत चौघांना जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कोर्टामध्ये जिल्हा प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर कोर्टाने सचिन कोतकरला जिल्हा प्रवेशाची परवानगी दिली मात्र या प्रकरणातील अमोल कोतकर, संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांना आजही जिल्हा प्रवेश बंदी कायम आहे.

PM मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभेचे रणशिंग, करणार मेट्रो मार्गाचे उद्घाटन

दरम्यान संदीप , सचिन व अमोल कोतकर यांना मेडिकल पॅरिटीवर मिळालेल्या जामिनास सुप्रीम कोर्टात आव्हान करणार असल्याची माहिती फिर्यादी राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मराठा समाज हा सर्वांना सोबत घेणारा समाज; मनोज जरांगेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा -शरद पवार

follow us