मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच राज्य सरकारने आज प्रशासनातील महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसापासून या पदांवर कुणाची नियुक्ती होते, याविषयी कमालीची उत्सुकता होती. अखेर आज मुखर्जी यांची नियुक्ती झाली.
सुमारे दिड लाख कोटी पेक्ष जास्त कामे सुरु असलेल्या एमएमआरडीए या विभागाचे आयुक्त असलेल्या श्रीनिवास यांची बदली करण्यात आली. श्रीनिवास हे भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. त्यांची बदली झाल्याने या जागी कोण येईल, याबाबत उत्सुकता होती. या पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले संजय मुखर्जी आणि देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचा आग्रह असलेल्या अश्विनी भिडे यांच्यात स्पर्धा होती.
ST चे स्टेअरींग आता महिलांच्या हाती, अहमदनगर आगारात पहिल्यांदाच महिला ड्रायव्हर नियुक्त
मुंबईत मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीत अश्विनी भिडे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भिडे यांनी केलेलं काम पाहता त्यांच्याकडे एमएमआरडीए विभाग असायला हवा, भाजपाचा आग्रह होता. तर सिडको हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागामध्ये असल्यापासून संजय मुखर्जी हे एकनाथ शिंदे यांचे खास आहेत. त्यामुळं मुखर्जी हे पदावर असायला हवेत, अशी शिंदेची इच्छा असावी. त्यामुळं ही नियुक्ती करतांना भाजपच्या शिफारशी किंवा भाजपला काय वाटतं, याला फारस महत्वं न देता, एमएमआरडीएच्या आयुक्तपदी मुखर्जी यांनी निवड झाली.
एमएमआर रिजनसाठी दिड लाख कोटीची कामे आणि या विभागासाठी काढण्यात आलेले सुमारे साठ हजार कोटी रुपयांचे कर्ज यामुळे या विभागात वर्णी लावण्यासाठी कमालीची स्पर्धा लागली होती. अशात आता या पदावर शिंदेच्या मर्जीतील संजय मुखर्जी यांनी बाजी मारली. त्यामुळं एमएमआरडीए विभागावर मुख्यमंत्री शिंदेचा वरचष्मा दिसून येतो. तर अन्य बदल्यामध्ये मनीषा म्हैसकर यांना प्रोटोकॉल विभाग देण्यात आला आहे. तर एमएमआरडीए रिजनचे अतिरिक्त आयुक्त एच गोविंदराज यांना पुन्हा वजनदार खातं देण्यात आलं आहे. त्यांची वर्णी आता प्रिन्सिपॉल सेक्रेटरी, नगरविकास विभाग या ठिकाणी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी एमएमआर रिजन चे अतिरिक्त आयुक्त (२) म्हणून अशिश शर्मा हे हे जबाबदारी पाहणार आहेत.