ST चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती, अहमदनगर आगारात पहिल्यांदाच ड्रायव्हर म्हणून नियुक्ती

ST चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती, अहमदनगर आगारात पहिल्यांदाच ड्रायव्हर म्हणून नियुक्ती

Appointment of two women as ST drivers for the first time : आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेतली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात. मात्र, राज्यातील एसटी बसचे (ST Bus) चालक म्हणून अद्याप महिलांना नियुक्त करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग दिसणार आहे. नुकतीच अहमदनगर आगारामध्ये दोन महिलांची एसटी चालक (ST driver) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बहुतेक आपण सगळ्यांनी कधी ना कधी एसटीने प्रवास केला असेल. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, असं आजही ST वर लिहिलेलं असतं. त्यामुळेच आजही अनेकजन लालपरिनेच प्रवास करणं पसंत करतात. राज्यातील पहिली एसटी महामंडळाची बस १ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे दरम्यान धावली. या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अहमदनगर शहरात आयोजित कार्यक्रमात प्रथमच दोन महिला कर्मचाऱ्यांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोनाली माधव भागडे व सुनंदा सुरेश सोनवणे अशी या महिला चालक कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Letsupp Special : रेल्वे अपघाताचे ‘वंदे भारत’ कनेक्शन; मालगाड्यांचे प्रमाण अन् वाढती ठेकेदारीही मुळाशी?

राज्य परिवहन सेवेची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर नियमित कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली. महिला कर्मचाऱ्यांची यापूर्वीच वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महिला कर्मचाऱ्यांना तब्बल ७५ वर्षांनंतर चालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. एसटीच्या थेट सेवा भरती 2019 साठी अहमदनगर विभागात महिलांसाठी नऊ जागा होत्या. त्यापैकी चार महिला उमेदवार पात्र ठरल्या होत्या. चार पात्र महिला उमेदवारांपैकी एक महिला उमेदवार उपस्थित राहिल्या नाहीत. तर तीन महिलांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून आज दोन महिला कर्मचाऱ्यांना एसटी वाहक म्हणून नियुक्त केलं.

सोनाली माधव भागडे व सुनंदा सुरेश सोनवणे यांनी नगर विभागांतर्गत तातडीने काम सुरू केले आहे. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी ही नियुक्ती दिली आहे. यासोबतच आशा नवनाथ खंडीजोड यांची नियुक्तीही लवकरच केली जाणार आहे. महिलांना चालक म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. राज्यातील विविध विभागांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube