अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करणार नाहीत, असं खोचक उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार पुन्हा भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिल आहे.
आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागे अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि सध्या राज्यात अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी घेवून ते मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. याचा दुसरा कोणताही अर्थ नाही.
ते पुढे म्हणाले की अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच भविष्य उज्वल आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ते मिंध्या प्रमाणे निर्णय घेतील असं वाटत नाही. ते एखाद्याच मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही. असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की विरोधी पक्ष एकत्र होऊ शकत नाही, अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. पण अशी परिस्थिती नाही, आम्ही राज्यात एकत्र आहोत, देशात आम्ही एकत्र आहोत. देशातील सर्व प्रमुख पक्षांशी आमचा संपर्क आहे. आजच राहुल गांधी, नितीश कुमार यांची दिल्लीमध्ये भेट झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र आहेत आणि राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकरांचा आमदार-खासदारांना इशारा; बार्टीची फेलोशिप द्या, अन्यथा…
राज्यभरात महाविकास आघाडीच्या सभा होतायेत, शिवसेनेच्या स्वतंत्रपणे देखील होताय. त्यामुळे राज्यभरात उद्धव ठाकरे प्रमुख ठिकाणी जातील, पक्ष बांधणीसाठीही ते गरज असतील त्या ठिकाणी जातील. येत्या २३ एप्रिल ला ते जळगाव मधील पाचोरा या ठिकाणी सभा घेणार आहेत. नाना पटोले यांनी जी भूमिका घेतली आहे, ती माहित नाही. पण काल जी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. त्यामध्ये राज्यभरात महविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्यावर चर्चा झाली आहे, तोच विचार आम्ही पुढे नेणार आहोत.