Download App

फक्त जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी… भुजबळांचं नाव घेत काय म्हणाले राऊत?

नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रीमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र, यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं. यानंतर नेत्यांचं नाराजीनाट्य सुरू असून छगन भुजबळांनी तर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तर तानाजी सावंत, रवी राणा यांच्यासारखे नेते (Sanjay Raut) आपल्या बॅगा पॅक करून नागपुरातून निघून गेले. महायुतीमधील या नेत्यांच्या नाराजीनाट्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला टोला लगावला आहे.

भुजबळ अन् मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपची प्रतिक्रिया; काय म्हणाले बावनकुळे?

काय म्हणाले संजय राऊत ?

नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे या सरकारला तडा जाणार नाही, नाराजांना एखादं खेळणं देऊन गप्प बसवतील, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसंच, भारतीय जनता पक्षाकडे स्वत:चं बहुमत आहे, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे एकत्र मिळून त्यांच्याकडे 225 च्या आसपास आकडा आहे. राज्यातील 288 सदस्यांच्या विधानसभेत हे बहुमत खूप मोठं आहे, त्यामुळे कोणाच्या मनातला अंगार, संताप, असंतोष कितीही बाहेर पडला, तरीही त्या ठिणग्यांनी या ईव्हीएम सरकारला चटके बसतील अशी शक्यता वाटत नाही असंही ते म्हणालेत.

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, असं आमच्या सर्वांचं म्हणणं होतं, असं राऊत म्हणाले. कारण दोन्ही समाज ( मराठा आणि ओबीसी) हे महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावी ही आमची सर्वांची भूमिका असताना भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. मनोज जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा पुरेपूर वापर करण्यात आला, असा आरोप राऊतांनी केला आहे.

वाऱ्यावर सोडलं

भुजबळांनी कितीही आदळआपट केली तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे, हे पहावं लागेल, असं राऊत म्हणाले आहेत. तसंच, महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा रहावा, समन्वय रहावा ही आमची सर्वांची आजही भूमिका आहे. पण आता बाकी इतर लोकं अश्रू ढाळत आहेत, त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय ? पुरंदरचे आमदार असो वा मुंबईतल्या मागठाण्याचे आमदार असोत, किंवा स्वत: चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार असोत, संजय कुटे त्यांच्या अश्रूंना काय किंमत आहे ? रडतील रडतील आणि गप्प बसतील , आपटतील आपटतील आणि गप्प बसतील, अशी टीका राऊतांनी केली आहे.

follow us