Download App

Sanjay Raut : गद्दारी-बेईमानी हा ‘अंगार’ नव्हे ‘भंगार’; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष काढून जनतेला सामोरे जावे. त्यानंतर अंगार कोण व भंगार कोण हे त्यांना कळेल, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

Maratha Reservation : उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा

राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, तुमच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे. दादा भुसे यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले, 200 कोटी मनी लाँड्रिंगचे प्रकरण आहे, त्यावर माझ्यावर मानहानीचा खटला दाखल केला, त्याला आम्ही नक्कीच सामोरे जाऊ. पण, त्याहून अधिक गंभीर म्हणजे, ड्रग्जमाफियाला ससून रुग्णालयात दाखल करून घेत त्याची काळजी घेतली. काहीतरी पुरावे असल्याशिवाय सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर, नाना पटोले बोलणार नाहीत.

शिंदे-फडणवीस चौकशी करतील का?

ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली. त्या मंत्र्याचे नाव जाहीर केले आहे. त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. या पैशांतून भुसेंना मोठी आर्थिक मदत मिळत होती, असा गंभीर आरोप करत या प्रकाराची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का?, असा सवाल राऊत यांनी विचारला. दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणात संबंध काय? दादा भुसे आणि शिंदे गटाला किती कोटी मिळाले? असेही सवाल राऊत यांनी उपस्थित केले.

Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण

भाजपा मुख्यालयात नोटा छापण्याची मशीन

यानंतर राऊत यांनी भाजपवरही घणाघाती टीका केली. विरोधी पक्षांनी पैसे खर्च केले तर लगेच ईडी, सीबीआयच्या धाडी पडतात. पण भाजपा मुख्यालयात तर नोटा छापण्याची मशीनच आहे इतका खर्च केला जात आहे. भाजपाला कुणाकडून पैसा मिळतोय. इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून पैसे खर्च केले जात आहेत ते पैसे नेमके कुणाचे आहेत, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.

Tags

follow us