Maratha Reservation : उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फुलंब्री शहरात होते. येथेही त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यानंतर येथे नागरिकांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सरकारला रोखठोक शब्दांत इशारा दिला. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या वेदना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकारनं लक्षात घ्यावं याचा उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
Maratha Reservation : ‘आमच्यावर लाठीहल्ला का केला?’ नाशकातून जरांगेंचा सरकारला थेट सवाल
फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतरचा 41 वा दिवस आपला असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. त्यामुळे आपली एकजूट मोडू देऊ नका, अस आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठा समाजाला संपूर्ण राज्यात सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, यात सरकारने पुन्हा चालढकल केल्यास त्याचे वाईट पऱिणाम होतील,असा इशारा त्यांनी नाशिक येथे बोलताना दिला होता. मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना मराठा समाजाने एक इंचही मागे हटू नये. सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांकडून मराठा समाजातील नेत्यांमध्ये फूट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही जरांगेंनी याआधी व्यक्त केली होती.
लोकांचा मृत्यू होतोय संवेदनशीलता आहे की नाही ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सरकारने समाजाच्या वेदना लक्षात घ्याव्यात. भावनाशून्य होऊ नये. आंतरवाली सराटीत आमच्यावर गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावेत. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडूच. समाजासाठी मी कधीच गद्दारी केली नाही. यामुळेच नेहमी सगळ्यांसमोर खुल्या व्यासपीठावर चर्चा केली. एकदा समाजाला मायबाप म्हटल्यानंतर त्यांच्याशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, असेही जरांगे म्हणाले.