Download App

घरातील मंगळसुत्राची किंमत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या मंगळसुत्राबद्दल काय बोलावं ? राऊतांची घणाघाती टीका

सासवड येथील सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदींना औरंगजेबाची उपमा दिली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Sanjay Raut Criticism On PM Modi : बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झालाय तर औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय असा दावा संजय राऊतांनी केला. (Baramati Loksabha) तसंच, राऊतांनी औरंगजेबाचं जन्मगावंही सांगितलं. गुजरातमधील मोदींच्या गावाशेजारी दाहोद या गावी औरंगजेबाचा जन्म झालाय म्हणून मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय असा थेट घणाघात राऊतांनी यावेळी केला.

 

 

आपल्या घरातील मंगळसुत्राची किंमत नाही

यावेळी राऊतांनी गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज खोट बालतं आहेत असा थेट आरोप करत जोरदार टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल मोदी बोलले त्यावरून राऊतांनी जोरदार टीका केली. राऊत म्हणाले हे खोट बोलतात की जास्त मुलं आहेत त्यांना काँग्रेस आपली संपत्ती वाटणार आहे. मंगळसुत्रावरही हा माणूस बोलतो असं म्हणत ज्यांना आपल्या घरातील मंगळसुत्राची किंमत नाही त्यांनी दुसऱ्याच्या मंगळसुत्राबद्दल काय बोलावं असा टोलाही त्यांनी लगावला.

 

शरद पवारांना संपवण्यासाठी मोदी बारामतीत येतात

इतक सातत्याने खोट बोलत असलेला पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपल्या देशाचं, लोकशाहीचं दुर्दैव आहे असं म्हणत राऊतांनी जोरदार हमला केला. परंतु, आपल्याला देश, संविधान लोकशाही वाचवायची असेल तर ही हुकुमशाही हटवावी लागेल. आणि याची सुरूवात महाराष्ट्रातून करावी लागेल असंही राऊत यावेळी म्हणाले. तसंच, शरद पवारांना संपवण्यासाठी मोदी बारामतीत येतात. पवारांच घर फोडतात. आपण हे सहन करणार का? तसंच, यांनी बाळासाहेबांचे, शरद पवारांचे पक्ष महाराष्ट्रात येऊन फोडले. तसंच, तीन तीन नवरे करूनही यांचा विकास जन्माला आला नाही अशा शब्दांत राऊतांनी यावेळी जोरदार टीका केली.

follow us

वेब स्टोरीज