Sanjay Raut Tweet on Ravindra Waikar : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 15 दिवस उलटले आहेत. (EVM) मात्र, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालाची चर्चा काही थांबलेली नाही. (Sanjay Raut ) येथे शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. (Ravindra Waikar) दरम्यान, त्यांच्या या निकालावर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. आता या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
निकाल बदलण्याचा प्रयत्न Rahul Gandhi: ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण
रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा खळबळजनक दावा केला आहे. तसंच, वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काय डील करत होते?
वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं) पी आय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली आहे.
पत्रकार परिषद
रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्त फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचं ऐकलं. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचं बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत. लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
गुरव यांचं निलंबन
सूर्यवंशी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या होत्या की, ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडलं जात नाही. निवडणूक कर्मचारी गुरव यांचा तो स्वत:चा मोबाइल आहे. त्यांना तो ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आम्हीही याचा अंतर्गत तपास करणार आहोत. नायब तहसीलदारांनी गुरव यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली असून गुरव यांना निलंबित करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निवडणूक अधिकाऱ्यावरही संशय NEET Result: एनटीएचे मोठे अधिकारी आता आले रडारवर ! शिक्षणमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करणाऱ्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरही राऊतांनी मोठा आरोप केला आहे. सूर्यवंशी यांचा वायकर यांना विजयी करण्यामध्ये मोठा हात आहे असा थेट आरोपच त्यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते असे अब्जाधीश एलॉन मस्क सांगत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याचा पूर्वेतिहास जाणून घ्यावा. तसंच, या वंदना सूर्यवंशींचा मोबाइलही जप्त करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.