Download App

Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर हिंसा ज्यावर युरोपियन संसदेत चर्चा होते. संयुक्त राष्ट्रसंघातही या घटनांवर प्रश्न उपस्थित केले जातात. पण आपल्या संसदेत चर्चा होत नाही. पंतप्रधानांनी 80 दिवसांनंतर निवेदन दिले तेही संसदेच्या बाहेर त्याने काय होणार आहे?, दोन महिलांची विवस्त्र परेड काढली जाते हेच आपल्या देशाचे चरित्र आहे का?, तुम्ही समान नागरी कायद्याच्या गप्पा मारता पण त्याआधी मणिपुरमधील कायदा सुव्यवस्थेवर बोला. तुम्ही यावर का बोलत नाहीत, असे जळजळीत सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारले.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले, 70 दिवस होत आले आहेत. मणिपूर शांत करता येत नाही. मणिपूर हा देशाचा भाग आहे. तेथील जनताही या देशाची नागरिक आहे. मणिपुरातील घटना देशातील 140 कोटी लोकांसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय ना, आधी मणिपुरातील कायदा सुव्यवस्था सुरळी करा, अशी टीका त्यांनी केली.

Manipur Violence : मणिपूर घटनेचे विधानसभेत पडसाद; वर्षा गायकवाड, यशोमती ठाकुर आक्रमक

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना मणिपुरमधील हिंसा रोखता आली नाही, त्यामागे कारण काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ असतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते काही करत नाहीत. यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे याचे उत्तर येणारा काळ देईल.

मुंबईत कोणताही घोटाळा नाही

मुंबईत कोणताच घोटाळा झालेला नाही. ईडी आणि सीबीआय या यंत्रणा भाजपाच्या हस्तक आहेत. सगळ्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. मी स्वतः ईडीला दहा पत्रे लिहीली आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांना झाकीर नाईककडून पैसे आले आहेत. त्यांना चौकशीला बोलावले का, दादा भुसे यांचे 178 कोटींचे तर राहुल कुल यांचे 500 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग आणखी किती नावे घेऊ. मुंबईत कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वात चांगले काम केले. त्यावेळी पँडेमिक कायदाही लागू होता आणि लोकांचे जीव वाचविणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे होते. त्यामुळे सध्या टार्गेटेड लोकांना पकडले जात आहेत.

Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…

 

Tags

follow us