Manipur Violence : मणिपूर घटनेचे विधानसभेत पडसाद; वर्षा गायकवाड, यशोमती ठाकुर आक्रमक
Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात (Manipur) उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत (Mharashtra Assembly Session)
पडल्याचं पाहायला मिळालं. यावळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. तर कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) आणि यशोमती ठाकुर( Yashomati Thakur) आक्रमक झाल्या होत्या. (Opposition Aggressive on Manipur Violence in Maharashtra Assembly Session)
राज्यभर मुसळधार : ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला रेड अलर्ट!
विधानसभेत काय घडलं?
आजच विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आसनावर स्थानापन्न होताच मणिपूरच्या घटनेवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकुर आक्रमक झाल्या होत्या. अशिष शेलार, अतुल भातखळकर बोलत असताना विरोधकांची ही जोरदार घोषणाबाजी सुरू होती. राहुल नार्वेकरांनी हा मुद्दा मांडण्यासाठी प्रस्ताव सादर करा मग त्यावर चर्चा होईल असं उत्तर दिल्याचं पाहायला मिळलं.
‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला
दरम्यान विधानसभेचं कामकाज सुरू होण्याअगोदर देखील सभागृहाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांनी मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली होती. यामध्ये कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकुर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तरी देखील या गोंधळातही विधानसभेचं कामकाज सुरू होत. पण आज विरोधकांच्या अजेंड्यावर मणिपूरचा मुद्दा आहे.
जगभरासह देशभरात चर्चेत असलेल्या मणिपूरच्या(Manipur) महिला विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh) यांनी दिली आहे. विवस्त्र महिलेची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. अखेर जनतेच्या रोषापुढं सरकारने गुडघे टेकले आहेत. विवस्त्र महिलेची धिंड काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh यांनी स्पष्ट केलं आहे.