Sanjay Shirsat Guardian Minister Of Chatrapati Sambhajinagar : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालंय. संजय शिरसाट यांच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची (Guardian Minister) माळ पडलीय. त्यानंतर संजय शिरसाट यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. संजय शिरसाट यांच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची माळ पडलीय. त्यानंतर संजय शिरसाट यांनी जाहीर सभेला संबोधित (Chatrapati Sambhajinagar) केलंय. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, पालकमंत्री म्हणून आज उभा राहिलोय. एक स्वप्न पाहिल्यासारखं वाटत आहे.
Video : पुण्यात बार कर्मचार्यांची मुजोरी; मध्यरात्री २ तरूणांना जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल
मी कधीही निवडणुकीत टेन्शन घेत नाही, परंतु करेक्ट कार्यक्रम करतो, असं संजय शिरसाट जाहीर सभेत म्हटले आहेत. ही निवडणूक वेगळी होती. सुरत-गुवाहाटीचा प्रवास, सत्तांतर, बंडखोरीचा प्रवास आणि आम्हाला लागलेले शिक्के (Maharashtra Politics) होते. मी ते पाहात होतो. वातावरण बिघडवलेलं होतं. मी वेडा आहे का, 40 वर्षात एका पक्षात काम केलेला माणूस असा कसा दुसऱ्या पक्षात जाईल, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
या निवडणुकीला मला मातोश्रीच्या एका जबाबदार माणसाचा फोन आला होता. मला विचारलं आमचा उमेदवार कोण आहे तुमच्याकडे? ते म्हणाले ज्याने उमेदवार रिकमंड केलाय. त्याचा इतिहास असा आहे की, ज्याने सुचवलेले सर्व उमेदवार पडतात. पक्ष त्यांचा उमेदवार कोण हे मला विचारत होते. उमेदवार कोण, हे देखील आपण ठरवत होतो. त्यामुळे मला चिंता नव्हतीच, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.
नक्षलवादावर प्रहार! गरियाबंद चकमकीत 19 नक्षलींचा खात्मा; सुरक्षा दलांची धाडसी कामगिरी
काय हे हिरवे पिवळे ड्रेस घालतात, अन् अविर्भावात येतात. अन् म्हणतात या गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी शिवसेना अपेक्षित होती का? असा सवाल देखील केलाय. शिवसैनिकांनो तुम्ही सोडून जावू नका. 22 तारखेला त्यांच्या माणसांचा प्रवेश मी घेतोय, असं देखील शिरसाट म्हणालेत. सिल्व्हर ओकवाले तुमचे कोण आहेत? का तुम्ही तिथे पाया पडतात? असा सवाल त्यांनी केलाय. यांचा कान कुणी पकडायचा? आजही त्यांची लाचारी सुटलेली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतंय. हे सुधारणार नाहीत, अशी टीका त्यांनी केलीय.
शिंदे साहेबांच्या सर्व निर्णयांत मी होतो. त्यांनी एकही निर्णय मला विचारल्याशिवाय घेतलेला नाही. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही तर आपण कसले कार्यकर्ते, असा सवाल त्यांनी केलाय. मला पाडण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण तुमच्या आशिर्वादाने मी निवडून आलोय. एक जबाबदारीचा क्षण माझ्या आयुष्यात आला. पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देतो तुम्हाला असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
राजकारणात विरोध तात्पुरता असायला हवा. पण लोकाचं घर कशाला जाळायचं? असा सवाल देखील त्यांनी केलाय. पाच वर्ष मी राहील, असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय. वेळ येवू द्या.