Santosh Deshmukh Murder Case Two officers appointed in SIT : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठं अपडेट आहे. दोन अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी ही नियुक्ती केली असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या तपासासाठी ही नियुक्ती केली असावी, असं धनजंय देशमुख यांनी म्हटलंय.
डिस्चार्ज अर्जावरील ऑर्डर अजून बाकी (Beed Crime) आहे. तसेच आरोपी वाल्मिक कराडच्या ट्रान्स्फर अर्जावरील ऑर्डर देखील अजून बाकी आहे. त्याने अर्ज दिला होता की, सुरक्षेच्या कारणास्तव मला लातूर येथे ठेवण्यात यावं. परंतु ते आपल्यासाठी महत्वाचं नाही, त्यासाठी कोर्ट आहे. कोर्ट त्याचा निर्णय घेईल.
संविधानिक पदाचा वापर राजकीय ताबेदारीसाठी…, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला
येत्या 7 तारखेला आमचे दोन अर्ज असतील. जेल प्रशासनाकडून अपेक्षित माहिती मागितली होती. अजितदादांना निवेदन देखील दिले होते. ज्या मागण्या पूर्ण झाल्या, त्या वगळून बाकीच्या काही मागण्या असून त्यावर चर्चा झालेली आहे, त्यावर कारवाई होणार आहे. चार पाच दिवस आपण त्यासाठी थांबणार आहे. जर निर्णय झाले नाही तर 7 जूनला हे दोन अर्ज आम्ही देणार आहोत, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय.
भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कधी आणि कशी झाली?
बीडमधील मसाजोग गावचे सरपंच देशमुख यांनी गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील वीज कंपनीला लक्ष्य करून खंडणीचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अपहरण करून छळ करण्यात आला होता. यानंतर त्याची हत्या करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 27 फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या हत्येसह संबंधित दोन प्रकरणांमध्ये बीड जिल्हा न्यायालयात 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
बीडच्या केज पोलीस ठाण्यात सरपंचाची हत्या, आवादा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी कृ्ष्णा आंधळे अजूनही फरार आहे.