Mahavitaran employee assaulted : चंद्रपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Mahavitaran ) येथे सरपंचाने महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून मारहाण केली आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्याने घुग्घुस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. (PM Modi) सुरज परचाके असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Car Accident) मारहाण करणारा नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर हा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे.
दोन तास त्यांनी बांधून ठेवलं रील बनवणं जीवावर बेतलं; कार चालवताना रेसवर पडला पाय, 500 मीटर दरीत कोसळून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडं उसगाव आणि नकोडा या दोन गावाचा प्रभार आहे. नेहमीप्रमाणे महावितरण कर्मचारी परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडवलं. बंदुरकर म्हणाले, डीपीजवळ काम आहे, नकोड्याला चला. नकोड्याला गेल्यावर त्यांनी मला माझ्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधलं. गावाकऱ्यांना गोळा केलं. साधारणत: दोन तास त्यांनी बांधून ठेवलं.
गुन्हा दाखल करण्यात आला
घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना फोनवर माहिती दिली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडवलं. त्यानंतर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. मागील काही दिवसांपासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. त्या रागातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करंत आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर सरपंच फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गर्मीमुळे लोक प्रचंड संतापले ऑस्ट्रेलियन पत्रकाराकडून PM मोदींवर माहितीपट; भारतात वार्तांकन करण्यासाठी केला होता मज्जाव
या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे थोडा वादळ वारा आला तरी वीज पुरवठा खंडित होतो. जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे प्रचंड गर्मी आहे. गर्मीमुळे लोक प्रचंड संतापले आहेत. त्यात वीज पुरवठा खंडित झाला की उकाड्यात बसून गर्मीचा त्रास सहन करावा लागतो. घरात लहान मूल असल्यास त्यांना आणखी चिडचिड होते. तेव्हा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यापेक्षा वीज खंडित होत असल्यानं त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.