रील बनवणं जीवावर बेतलं; कार चालवताना रेसवर पडला पाय, 500 मीटर दरीत कोसळून मृत्यू
Reel Shooting Car fell : रील बनववण जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. (Car Accident) मित्रासोबत मोबाईलवर रील बनवताना युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (PM Modi) कार चालवताना ॲक्सिलरेटरवर पाय पडून कार वेगात मागच्या सुमारे ५०० मीटर दरीत कोसळी. (Reel) या अपघातातच युवतीचा मृत्या झाला. तर कारचा चक्काचूर झाला. श्वेता दीपक सुरवसे (२३) रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर असं मृत युवतीचं नाव आहे.
कार चालवून बघते
रीलचा नाद जीवावर, रिव्हर्स घेताना एक्सलेटरवर पाय, कार दरीत कोसळून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू pic.twitter.com/hcsepNt9hh
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 18, 2024
मित्र शिवराज संजय मुळे आणि श्वेता सुरवसे हे छत्रपती संभाजीनगर येथून कारने (एमएच २१ बीएच ०९५८) शूलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. या ठिकाणी ते मोबाइलवर फोटो काढण्यासह रील्स बनवत होते. श्वेताने शिवराजला ‘मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर, असं म्हणत ती ड्रायव्हिंग सीटवर बसली.
थांब म्हणेपर्यंत कार दरीत Pune Car Accident: पोलिसांकडं भक्कम पुरावे; जूनअखेर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
या वेळी कार चालू करून ती रिव्हर्स गिअरमध्ये मागे नेत होती. मात्र, दरी जवळ आली तरी तिला ब्रेक दाबता न आल्याने कार दरीत कोसळली. त्यामध्ये तीला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, कार दरीत पडण्याची शक्यता दिसताच शिवराज श्वेताला ‘थांब थांब असं जोरात ओरड राहिला. मात्र, तोपर्यंत कार डोंगरावरून कोसळून मागील खोल दरीत कोसळली.