Mahavitaran : घरगुती वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार !

Mahavitaran : घरगुती वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार !

मुंबई : महावितरणने वीज नियामक आयोगाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव 2023-24 साठी असून यामध्ये तब्बल 37 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे आता सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वात जास्त वीजदर असल्याने महाराष्ट्रातील 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापर घरगुती ग्राहकांना 800 ते 1700 रुपयांपर्यंत दरवाढ सोसावी लागणार आहे.

तर दरमहा दीडशे ते तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना 400 ते 800 रुपयांपर्यंत अतिरिक्त झटका बसणार आहे. व्यापारी , छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास ३० % दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. यातून नवीन उद्योग महाराष्ट्रात येणं तर सोडाच आहेत तेही महाराष्ट्रातून पळ काढण्याची भिती आहे. व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागणार आहे.

यावर पुण्यातीस एका नागरिक मंचाने यासंदर्भात नगरिकांना आपल्या हरकती मांडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. ‘नागरीकांना आमचे आवाहन आहे की या प्रस्तावित दरवाढीला ऑनलाईन पध्दतीने 15 फेब्रुवारीपर्यंत www.merc.gov.in/e-public-consultation या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत त्याचा उपयोग करुन मोठ्या संख्येने या हरकती नोंदवाव्यात.’ असं या मंचाने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube