Download App

सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात…

सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव गेला, ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत.

टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी

पवार म्हणाले, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला. त्यावेळी स्थानिकांशी त्यांची भांडणे, बाचाबाची झाली. दोन दिवसांनंतर स्थानिक आणि कदम आक्रमक होतं वाद झाला.

वादाचा राग आल्याने मदन कदम यांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. एका सोसायटीची निवडणूक व पवनचक्कीचे प्रलंबित पेमेंट हा विषय सुध्दा या गोळीबाराच्या पाठीमागे असल्यांच अजित पवारांनी सभागृहात सांगितले आहे.

त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतेल प्रभावी

या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा मृत्यू या गोळीबाराच्या घटनेमुळे झाला. घटनेनंतर मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान, या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Tags

follow us