टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी

टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी

नवी दिल्ली : बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची कन्या जयंती चौहान (Jayanthi Chauhan) आता मिनरल वॉटर कंपनीची प्रमुख राहणार आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited TCPL) बरोबर अधिग्रहणाची बैठक संपल्यावर कंपनीने जयंतीकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला.

बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले आहे की, जयंती आमच्या व्यावसायिक टीमबरोबर कंपनी चालवणार आहे. आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही. टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) बरोबरचा करार रद्द केल्यावर, जयंती चौहान आता बिसलरीची जबाबदारी स्वीकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता जयंती चौहान बिसलरीच्या प्रमुख राहणार आहे. टाटाबरोबर करार रद्द झाल्यावर कंपनीने जयंती यांना प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या जयंती चौहान या कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सन म्हणून काम पाहत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, जयंती आता अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमबरोबर काम करणार आहे. जयंती वेळोवेळी मिनरल वॉटरच्या व्यवसायाशी संबंधित आहे. बिस्लेरीच्या पोर्टफोलिओचा एक भाग असलेला वेदिका ब्रँड हा अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्याचे पहिला लक्ष राहणार आहे.

दरम्यान, ८२ वर्षीय रमेश चौहान यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच टाटा समूहाला बिस्लेरी 7 हजार कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. 18 मार्च रोजी हा करार रद्द करण्यात आला. जयंती चौहान यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरात गेले आहे. हायस्कूलनंतर, तिने लॉस एंजेलिसमधील FIDM (फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंग) या ठिकाणी उत्पादन विकासाचा अभ्यास केला.

Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना मोठा धक्का; कोठडीतला मुक्काम वाढला

जयंतीने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. जयंतीने अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणून देखील काम केले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मधून त्यांनी अरबी भाषा शिकली. जयंतीने वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या वडिलांबरोबर बिसलरीच्या दिल्ली कार्यालयात काम सुरू केलं.

जयंतीने बिस्लेरीच्या प्लांटचे नूतनीकरण आणि प्रक्रिया ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी कंपनीच्या मानव संसाधन विभागात (HR) तसेच विक्री आणि विपणन संघात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. 2011 मध्ये जयंती दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाली. हिमालयाचे वेदिका नॅचरल मिनरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक्स आणि बिसलेरी हँड प्युरिफायर्स आदी बिस्लेरीचे नवीन ब्रँड चालवण्यात जयंतीचा महत्वाचा वाटा राहिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube