Download App

तब्येतची काळजी घ्या, आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलन करा, आंबेडकरांचा जरांगेंना पत्रातून सल्ला

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : चाळीस दिवसांची मुदत देऊनही सरकारने अद्याप मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहून पाठिंबा दिला. सोबतच एक सल्लाही दिला.

World Cup 2023 : पाकिस्तान संघ ठरला फेल! संघात गोंधळ सुरु; इंझमामने दिला राजीनामा 

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे मराठा आंदोलकही आता आक्रमक झालेत. बीडमध्ये आमदाराचे घरच पेटवून दिले आहे. मराठा आंदोलन हिंसक होत असताना आंबेडकर यांनी जरांगेंना खुले पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आंदोलकांना आंदोलनाची दिशा बदलण्याचा सल्ला दिला आहे. आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंडे या आंबेडकर यांचे पत्र घेऊन अंतरावली सराटीत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याकडे पत्र दिलं.

आंबेडकरांचं पत्र जसंच्या तसं-
प्रति,

माननीय, मनोज जरांगे पाटील
आपणास नमस्कार.

गरीब आणि रयतेच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभं केल आणि प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली. 2014 नंतर दुर्दैवाने देशात आणि राज्यात मनुस्मृती व्यवस्था माणणारे सरकार सत्तेत आलं. आणि या सत्तेच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर त्याचे मानसिक, सामाजिक आणि राजकीय खच्चीकरण करून, जाती-पातीत भांडण लावून देण्यात येते, हे थांबवणे गरजेचं आहे.

आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणाविरुद्ध लढत आहात आणि त्यासाठी तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. समाजात लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयते मराठ्यांना आपला मोठा आधार वाटत आहे. त्यामुळं आपण स्वत:ची जीव सांभाळावा, असं मी आवाहन करतो.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी करणारे गरीब मराठी आणि सदरची मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे. दोन्ही बाजून मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाही. सत्ता कॉंग्रेसची असो,भाजपची असो किंवा राष्ट्रवादीची असो यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नाही. याउलट सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतांवर आपली संपत्ती आणि सत्ता सातत्याने वाढवल्याचे आपण पाहतो. हा प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. आंदोलने आणि जनजागृतीच्या माध्यमातून या प्रश्नावर गांभीर्य निर्माण झाले आहे. पण दुर्दैवाने सत्तेत असलेले लोक अत्यंत निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करत आहेत. वर्तमानातील या सत्तेला मानवी चेहरा नाही असेच म्हटले पाहिजे. आज अनेक मराठा तरुण या निराशेतू आत्महत्या करत आहेत. त्यांच्या कडेही सध्याचे तीन पक्षाचे सत्ताधारी राज्यकर्ते दुर्लक्ष करतांना उभा महाराष्ट्र बघत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येऊन गेले. पण त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेखही केला नाही. या आधीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच सध्याच्या केंद्र व राज्य सरकारची भूमिका देखल ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच आहे. त्यामुळे आता आंदोलन सुरूच ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण पाणी सुद्धा पीत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी प्यावे.

वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. मराठा आरक्षणाचा विषय केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितला आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदार-खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्याशिवाय केंद्र व राज्य सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही आणि चे जागेवरून हलणार देखील नाहीत. या संदर्भात आपल्याला सुचवत आहोत की, मराठा आरक्षणाची तीव्रता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून निवडून गेलेले जे खासदार आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलन केले तरच ते जागेहून हलतील. त्यामुळे आपण या उपोषणाला त्या दृष्टीने योग्य वळण द्यावे, ही विनंती.

या अकार्यक्षम सरकार च्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकार मधील किंवा सर्वच पक्षां मधील आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरावस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतयं. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांचा पाठिंबा या आंदोलनाला दिलाय. तसेच या आंदोलनामुळे मनोज जरांगे यांची प्रकृति ढासळत चाललीये. त्यामुळे त्यांच्या प्रकृतिची काळजी घेण्याचं आवाहन त्यांना संपूर्ण राज्यभरातून केली जातेय.

या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं आवश्यक आहे. गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार, शेतीची दुरवस्था असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवणे गरजेचे आहे, असं आबेडकरांनी लिहिलं. आंबेडकरांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags

follow us