Ambadas Danve : अंगावर फक्त पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही खरा वाघ मातोश्रीवर बसला आहे. अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. ते आज माध्यमांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये युवा सेनेने सर्वात जास्त जागांवर विजय मिळवत एबीव्हीपीचा (ABVP) पराभव केला आहे.
माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निरपेक्ष, बॅलेटवर निवडणूका लागल्या की अशाच निकाल लागणार आहे. मुंबईत शिवसेनेची ताकत आहे. या निवडणुकीत मोठा गॅप होता मात्र तरीही देखील आमचा मोठा विजय झाला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांना हरवले. भाजप, शिंदे आणि मनसे निवडणुकीच्या रिंगणात असताना आदित्य ठाकरे यांच्या नेतृ्त्वात युवासेनेने त्यांचा पराभव केला असं माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.
तसेच जे कोणी आम्ही वाघ आहोत असे म्हणत असेल तर त्यांना सांगतो अंगावर फक्त पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही खरा वाघ मातोश्रीवर बसला आहे. असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार टीका केली. राज्यात फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन काम सुरू असल्याचे नाटक केले जात आहे. विकास कामासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी सध्या राज्याची परिस्थिती आहे. असं देखील ते म्हणाले.
एकाच टप्प्यात आणि एकाच दिवशी निवडणूक व्हावी
आगामी विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात आणि एकाच दिवशी करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यावेळी केली. तसेच दुबार आणि बोगस मतदान करण्याचे प्रमाण वाढले आहे, कित्येक लोकांचे नाव दोन-दोन मतदारसंघात आहेत. सिल्लोड येथे 24 हजार दुबार नावे आहेत. असा आरोप देखील माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
तसेच आनंद दिघे यांनी चर्चा करावी असे एकनाथ शिंदे यांचे स्थान नव्हते आणि चित्रपटात दाखवलेले सर्व धादांत खोटे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खोटा अपप्रचार केला जात आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!
याच बरोबर सरकारने आदिवासी आमदारांच्या आणि समाजाच्या भावना समजून घ्यावात. नरहरी झिरवाळ हे उपोषणाला का बसतात ? त्यांचे सरकार आहे हे नाटक आहे, हे उपसभापती असून सरकारला आदेश देऊ शकतात त्यासाठी उपोषणाची गरज नाही. असं देखील ते म्हणाले.