Download App

मी भेटल्याशिवाय जाणारच नाही; छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवार काय म्हणाले?

बारामती येथे सभेत बोलताना छगन भुजबळांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेले होते.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Chhagan Bhujbal meet : नुकताच बारामतीत अजित पवारांनी आयोजीत केलेला मेळावा पार पडला. त्यामध्ये बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. (Sharad Pawar) दरम्यान, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भुजबळ पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. दरम्यान, आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी या भेटीवर भाष्य केलं.

सिल्व्हर ओकला भेट मी सांगितलं तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता; विधान परिषद निवडणुकीवर पवारांचा खुलासा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अस्थिरता आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला आहे. त्या मुद्द्यावरच भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली भुजबळ ज्यावेळी पवारांना भेटायला गेले तेव्हा त्यांना ‘सिल्व्हर ओक’ या निवास्थानी काहीवेळ थांबाव लागलं. लगेच पवारांची भेट झाली नाही. याबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे. भुजबळांसोबत काय बोलणं झालं? तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबत शरद पवार यांची भूमिका काय आहे? हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

मी जाणार नाही  मोठी बातमी! सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल; निवडणूक आयोगाचे आदेश

भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्या आधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगलं भाषण केलं. दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. ते आले तेव्हा मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली. मला सांगितलं भुजबळ साहेब आले आहेत. आणि ते एक तासापासून बाहेर वाट पाहत आहेत. तसंच, तुमची भेट झाल्याशिवाय जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे, असं भुजबळांनी आपल्याला सांगितल्याचं शरद पवार म्हणाले.

आरक्षणाबाबत काय म्हणाले?

मी बैठकीला गेलो नाही. दोन कारणं होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेचं उपोषण सुरू होतं. त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलं.

 सामंजस्याची भूमिका रिलायन्स जिओच्या रिचार्जला BSNL ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये पैशांचीही होईल बचत

दरम्यान, भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.

follow us