Download App

400 सोडा! बहुमत मिळण्याबद्दल शंका; पवारांकडून इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा

जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

Interview with Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालीये. राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. युतीच्या जागेवर महायुती आहे आणि आघाडीच्या जागेवर यंदा महाविकास आघाडी आहे. यामध्ये महाविकास आघाडीला राज्यात किमान 24 जागा मिळवतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी व्यक्त केला आहे ते एका मुलाखतीत बोलत होते.

 

 सर्व दिल्यानंतर अजितला आणखी काय हवं होतं? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

बहुमत मिळण्याबद्दल मला शंका

जनमतापासून जे संकेत मिळत आहेत त्यामधून देशात भाजपची सत्ता येईल असं चित्र नाही असं म्हणत देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यंदा १८ सभा घ्याव्या लागल्या, याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी भाजपनं अब की बार 400 पारचा नारा दिला होता. पण आता त्यांना बहुमत तरी मिळेल का? याबद्दल मला शंका वाटते, असंही पवार म्हणाले आहेत.

 

तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले

इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? पंतप्रधान कोण होणार? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘काही दशकांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. सरकार स्थापनेसाठी जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा निवडून गेलेल्या खासदारांनी देसाईंची निवड केली होती. इंडिया आघाडीला संधी मिळाल्यास तसंच होईल’, असं पवारांनी सांगितलं.

 

बूथ ताब्यात घेत मतदान करण्याचा परळी पॅटर्न, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली

पंतप्रधान मोदींनी राज्यातील प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख नकली संतान, त्यांच्या पक्षाचा उल्लेख नकली सेना असा केला. पुण्यातील सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्यावरुन पवारांनी उत्तर दिलं. पंतप्रधानांकडून अशा विधानांची अपेक्षा नव्हती. मोदींनी भाषेची पातळी सोडली अशी खंत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असा थेट घणाघात पवारांनी केला.

follow us