बूथ ताब्यात घेत मतदान करण्याचा परळी पॅटर्न, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

बूथ ताब्यात घेत मतदान करण्याचा परळी पॅटर्न, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

Rohit Pawar Tweet on Beed Lok Sabha :  बीड जिल्ह्यात दमदाटीचं राजकारण झालं असून अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेण्यात आले. तसंच, पैशांचंही मोठं वाटप झालं असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ चालू असल्याचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने होत आहे.

 

मराठा समाजाच्या रोषणामुळे बीडची प्रचारसभा टाळली का ? फडणवीसांनी दिलं उत्तर

क्लिन चीट दिली

रोहित पवार यांनी या घटनांना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर थेट आरोप केले आहेत. याबाबत अनेक व्हिडिओसह आमदार रोहित पवार हे ट्विट करत आहेत. त्यांनी आजही बीड लोकसभा मतदारसंघातील एक व्हिडिओ ट्विट केला असून, या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना त्यांनी क्लीन चीट दिल्याचं पाहायला मिळाल आहे.

 

अनेक व्हिडिओ समोर आले

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी गैरप्रकार आणि पैसे वाटप झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. हे आरोप करताना रोहित पवार यांनी काही व्हिडिओ देखील ट्विट केले होते. या व्हिडिओच्या आधारावर निवडणूक आयोगाने कारवाई देखील केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरू झालेलं व्हिडिओ पोस्ट करण्याचं सत्र रोहित पवारांचा अद्यापही सुरूच आहे. सध्या त्यांच्या निशाणावर बीड लोकसभा मतदारसंघ असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेक व्हिडिओ समोर आणले आहेत.

 

व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी 

पैशांचाही मोठ्या प्रमाणात वाटप

महायुतीकडून यावेळी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावर्षी निवडणुकीला जातीय रंग आल्याने या निवडणुकीची राज्यभर चर्चा आहे. ओबीसी विरूद्ध ओपण अशी लढत येथे झाली. तसंच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही मोठा प्रभाव बीड जिल्ह्यात असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक ठिकाणी दमदाटीचं राजकारण झाल्याचंही येथे पाहायला मिळालं. तसंच, पैशांचाही मोठा वापर झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube