माझ्यावर आरोप करणारे अण्णा हजारे, खैरनार आता कुठे आहेत? शरद पवारांचा थेट सवाल

माझ्यावर आरोप करणारे अण्णा हजारे, खैरनार आता कुठे आहेत? शरद पवारांचा थेट सवाल

Sharad Pawar On Anna Hazare : तत्कालीन उपायुक्त जी आर खैरनार यांनी माझ्याविरुद्ध ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला होता. चौकशा झाल्या. आरोपात तथ्य नसल्याचं पुराव्यानीशी समोर आलं. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं (Anna Hazare) काय झाले? ते आज कुठे आहेत? असा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) अण्णा हजारेंना डिवचलं.

मोठी बातमी! इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघात मृत्यू, इराणला मोठा धक्का 

एका वृत्तपत्राला शरद पवारांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, त्यांना किमान 50 टक्के जागा मिळतील. महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी जी भाषा वापरली, त्यामुळे मी थक्क आणि आश्चर्यचकीत झालो. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी माझा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आणि शिवसेनेला (ठाकरे गट) नकली असल्याची टीका केली. पंतप्रधानांकडून अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही; त्यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे, अशी टीका पवारांनी केली.

Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? ईव्हीएम मशीनला घातला हार! 

पवारांना अण्णा हजारेंविषयी विचारले असता ते म्हणाले की, समाजसेवक अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर.खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते, खैरनार यांनी माझ्याविरुद्ध ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला होता. चौकशा झाल्या. आरोपात तथ्य नसल्याचं पुराव्यानीशी समोर आलं. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते आज कुठे आहेत? असा टोला पवारांनी लगावला.

मोदींचा आत्मविश्वास कमी झाला….
माझ्या मते मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसतो, त्यामुळेच त्यांनी व्यापक प्रचारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींसारखे पूर्वीचे पंतप्रधान फक्त एक-दोन निवडणूक सभांना संबोधित करायचे, असेही पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचे मत अवास्तव वाटते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्यांनी अबकी बार, 400 पार चा नारा दिला आहे. मला माहित नाही की ते कोणत्या आधारावर चारशे पारची घोषणा देत आहेत. तो गाठणे फार कठीण आहे. कारण, देशभरात एनडीएच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळं भाजपला बहुमत गाठेल की नाही याबद्दल मला शंका आहे, असं शरद पवार म्हणाले.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube