‘हे’ सर्व दिल्यानंतर अजितला आणखी काय हवं होतं? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

‘हे’ सर्व दिल्यानंतर अजितला आणखी काय हवं होतं? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या अनेक आरोपांना सडेतोड उत्तर दिली आहेत. एका मुलाखतीत बोलताना पवारांनी ही उत्तर दिली आहेत. पवार म्हणाले, अजित पवार यांना काय कमी केलं? (Sharad Pawar ) नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

 

त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

सत्तापदं दिली

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. एक, दोन नव्हे तर तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिलं, हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवं होतं? असा प्रश्न करत शरद पवार म्हणाले, मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही. यामुळे सुप्रिया सुळे हिला फक्त खासदारकी दिली. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. तिला कधीही सत्तापद दिलं नाही. अजित पवार यांना कायमच सत्तापदं दिली असंही ते म्हणाले.

 

सत्ता केंद्राची विभागणी

जर राजकारणापलिकडे जाऊन अजित पवारांनी मदतीसाठी हात पुढे केला, तर तुम्ही त्यांना हात देणार का? असा प्रश्न विचारला असता पवारांनी स्पष्टच सांगितलं. असा प्रश्नच येणार नाही. अजितचा स्वभाव मला माहिती आहे. तो कधी कुणासमोर हात पसरणार नाही, असं शरद पवार म्हणाले. तसंच, यावेळी शरद पवारांनी भाजपवरही काही निषाने साधले आहेत. त्यांना पक्षातील फूट याबद्दल विचारलं असता त्यांनी एका सत्ता केंद्रला विभागण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न झाले असं पवार म्हणाले आहेत.

 

मी पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर, अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा पलटवार

भाजपला हे हवचं होतं

भापजमुळे राष्ट्रवादीत असा संघर्ष झाला का? असा सवाल शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘भाजपला हे हवचं होतं. मी या राज्यात हा पक्ष जो उभा केला. या सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावला. त्यातून आम्ही एक शक्तीकेंद्र तयार केलं. आमचे सगळे लोक 1999 पासून अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यातून काही लोकांना मंत्रीपद मिळालं, काहींना तर तीन वेळ उपमुख्यमंत्रीपद मिळालं. मात्र त्यांनी आता वेगळी भुमिका घेतली. आणि रस्ते वेगळे झाले. आता बघुयात पुढे काय होतं’, असे शरद पवारांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज