लोणावळा : मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि अजित पवारांना गर्भित इशारा दिला आहे. पवार म्हणाले की, आजच्या लोणावळ्यातील मेळाव्यासाठी तुम्ही येऊ नये यासाठी आमदारांनी आणि काहीजणांनी दमदाटी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, टीका करणाऱ्यांना फोन करण्यात आल्याची तक्रार काही कार्यकर्तांनी माझ्याकडे केल्याचे पवारांनी सांगितले. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्यावर टीका करायची नाही का असा सवाल करत सुनील शेळकेंना (Sunil Shelke) फैलावर घेतले. ते म्हणाले की, तु आमदार कुणामुळे झाला त्यावेळी सभेला इथे कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल पवारांनी आमदार सुनील शेळकेंना उद्देशुन केला. (Sharad Pawar Give Warning To Ajit Pawar MLA Sunil Shelke)
भाजपनं डाव बदलला; अमित शाहंच्या दौऱ्यानंतर पंकजा मुंडे अन् गडकरींचं नाव पुन्हा रेसमध्ये…
फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते ती सही माझी असल्याची आठवणही शेळकेंना यावेळी पवारांनी करून दिली. त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे तुम्हाला निवडणून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास पुन्हा असं काही केलं मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा. मी या रस्त्याने कधी जात नाही मात्र, या रस्त्याने जाण्याची कुणी स्थिती निर्माण केली तर त्याला सोडतही नाही असा इशारा पवारांनी शेळकेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला आहे.
“आमचे कार्यकर्ते फोडले जात असतील तर मला”.. वडिलांनंतर योगेश कदमही भाजपवर चिडले
यावेळी पवारांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतंय. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल, असंही पवारांनी म्हटलं आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.