Chinchwad Bypoll : सुनील शेळकेंनी नाना काट्यांचा लीडही सांगून टाकला

Chinchwad Bypoll : सुनील शेळकेंनी नाना काट्यांचा लीडही सांगून टाकला

पिंपरी : मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात मी भूकंप घडवला भाजपच्या तगड्या उमेदवाराला चितपट केला होता. तो करिष्मा ती जादू चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad Bypoll) होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंची वरती नेणं तसेच इथल्या मूलभूत सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महापालिका किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी केलेले आहे. स्व. रामकृष्ण मोरे असतील त्या सर्वांचं त्यामध्ये मोलाचे योगदान आहे. आणि त्या विचाराला खऱ्या अर्थाने चिंचवडची जनता साथ देईल. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) हे २५ ते ३० हजार मतांनी निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार तथा चिंचवड पोटनिवडणूक निरीक्षक सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे चिंचवड पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारात व्यस्त असलेले आमदार सुनील शेळके म्हणाले की, माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला विधानसभेमध्ये उमेदवारी मागतो आणि अजित पवार आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देतो. तसेच निरीक्षक या नात्याने आजही पिंपरी-चिंचवडमध्ये एका जबाबदारीने विश्वासाने मला पाठवतात, याचा अर्थ आम्हाला स्पष्टपणे दिसतो.

पिंपरी-चिंचवड शहराचा संपूर्ण कायापालट हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत जनता केवळ विकासकामे करणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहील. भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळणार नाही. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे कमीत कमी २५ ते ३० हजार मतांनी निश्चितपणे निवडून येतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube